माझे उपक्रम

मी  १९९३ मध्ये सहशिक्षक या पदावर श्रीकृष्ण विद्यालय, गुंजोटी येथे रुजू झालो. तेंव्हापासून ते आजतागायत सुरुवातीच्या  काळातील ४  ते ५  वर्षे सोडल्यास भूमिती (९ वी व १० वी) आणि गणित (७ वी व ८ वी) या विषयाचे अध्यापन करत आहे. आता फ़क़्त ९ वी व १० वी ला भूमिती या विषयाचे अध्यापन करत आहे.  या कालावधी मध्ये अध्यापन करत असताना विविध प्रकारचे प्रयोग करून अध्यापन कसे प्रभावशाली हाईल याचा सात्यात्याने प्रयोग करत गेलो आणि त्याचा परिणाम पण दिसत गेला.

   आमचा ग्रामीण भाग असल्याने स्पर्धा परीक्षेसाठी विशेष प्रयत्न करण्याचे ठरविले आणि बरेच विध्यार्थी यात यशश्वी झाले.

    गणितामध्ये भूमिती म्हणजे आवघड वाटणारा विषय विद्यार्थ्यांनसाठी असतो. त्यात ग्रामीण भागातील विध्यार्थी. यामध्ये गोडी लागावी म्हणून त्यांना सतत विषयाच्या संपर्कात ठेवण्याचा प्रयत्न केला. यासाठी नेहमी जादा तासिका घेणे , प्रत्येक घटकावर लहान लहान परीक्षा घेऊन त्याचे मूल्यमापन करणे, पालकांच्या सतत संपर्कात राहणे असे प्रकारचे विविध प्रयोग नेहमी करत असतो.याचा परिणाम म्हणून १० वी चा गणिताचा निकाल चांगला लागण्यात झाला.

    इ.९ वी मध्ये मुलाना भूमिती हा विषय थोडा आवघड वाटतो. ८ वी पर्यंत एकच गणिताचे पुस्तक हाताळेलळे असल्याने नवीन भूमिती आणि बीजगणित अशी दोन पुस्तके असल्याने कदाचित वाटत आसावे. मग या मुलांना गोडी लागावी म्हणून नवनवीन प्रयोग करावे लागतात. त्याना प्रोजेक्ट देणे, पोस्टर प्रदर्शन भरवणे इ.प्रकारचे प्रयोग करावे लागतात. यातून एकदा त्याना गोडी निर्माण झाली कि मग १० वी चा पाया तयार व्हायला मदत होते.

  प्रश्नपत्रिका आराखड्यानुसार  १,२,३ गुणांची उदाहरणे  जास्तीत जास्त सोडवून घेण्यावर व त्याचा सराव करून घेण्यावर जास्तीचा भर नेहमी असतो. प्रमेय म्हंटले कि विध्यार्थी घाबरतात पण योग्य पद्धतीने समजावून सांगून त्याचा सराव करून घेतल्यास प्रमेयाची भीती नाहीसी होण्यास मदत होते.

   प्रोजेक्टर च्या मदतीने भूमिती विषयाचे अध्यापन केल्याने विषय समजण्यास मदत होते. याचा वापर आमच्या विध्यालायात नेहमी केला जातो. ppt च्या सहायाने हि अध्यापन करण्याचा नेहमी प्रयत्न असतो. ppt चा वापर मी माझ्या अध्यापनात नेहमी करत असतो.



खाली मी लिंक देत आहे. खाली जि लिंक देत आहे असले व्हिडीओ मी download करून वर्गात दाखवतो.

खालील लिंक वर क्लिक करा व area of circle = area of triangle हि concept समजून घ्या.

https://www.youtube.com/watch?v=_0WeCqNzgqE

No comments:

Post a Comment